Video : तुम्ही भारतीय जवानाचा हा भन्नाट डान्स पाहिला का ?

एका व्यक्तीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही व्यक्ती भारतीय सैन्यातील जवान असल्याचे सांगितले जात असून, जवान आनंदात ‘उरी’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करत आहे.

एका ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, कॅप्शननुसार, हा व्हिडीओ कारगिलचा आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

लोक म्हणत आहेत की, एवढे वजनदार बूट घालून चालता देखील येत नाही. तेथे एक जवान डान्स करत आहे. युजर्स हाऊ इज द जोश ? असा प्रश्न विचारत या जवानाला सलाम ठोकत आहेत.

Leave a Comment