... जेव्हा 17 वर्षीय मुलगी हिजाब परिधान करून फुटबॉल खेळते - Majha Paper

… जेव्हा 17 वर्षीय मुलगी हिजाब परिधान करून फुटबॉल खेळते

जग आज तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बदलत चालले आहे. तरी देखील अनेक समाजात रुढीवादी परंपरेचे वास्तव्य स्पष्ट दिसून येते. मात्र हादिया हकिम या मुलीने अशाच अनेक रुढीवादी परंपरेला मात दिली आहे. मुली खेळ खेळू शकत नाही व खास करून हिजाब परिधान करून तर खेळूच शकत नाही, असा विचार करणाऱ्यांना हादिया हकिमने सडेतोड उत्तर दिले आहे.

हादिया हिजाब परिधान करून फुटबॉल खेळते.  सध्या 12वीमध्ये शिकत असून, ती केवळ 17 वर्षांची आहे.

तिने सांगितले की, ती जेथे राहते तेथे मुलींना खेळामध्ये एवढी संधी नाही.  मुलींची तर फुटबॉल टीम देखील नाही. जेव्हा तिने शाळेत फ्री स्टाईल फुटबॉल स्किल दाखवले, तेव्हा सर्वच हैराण झाले.

हादियाचे 10वी पर्यंतचे शिक्षण कतारमध्ये झाले आहे. तेथे ती शाळेतील फुटबॉल संघाचा भाग होती. काही दिवसांपुर्वीच तिचे कुटुंब केरळमध्ये राहण्यास आले आहे. तिचे वडील अब्दुल हकिम देखील बुटबॉल खेळाडू होते.

हा व्हिडीओ तिच्या शाळेतील कार्यक्रमाचा आहे. फुटबॉल सामना संपल्यानंतर तिने आपले फ्री स्टाइल फुटबॉल स्किल दाखवले. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असे अनेक व्हिडीओ आहेत.

Leave a Comment