
मुंबई : सध्या देशभरात नागरिकत्व संशोधन कायद्यावरुन वादंग सुरू असतानाच महाराष्ट्रातील राजकारण विविध नेत्यांच्या वक्तव्यामुळे ढवळून निघाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांनी जहरी टीका केली आहे.
अबू आजमींनी मागितला मोदींच्या आईच्या जन्माचा पुरावा
जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम समाज लढत होते, तेव्हा इंग्रजांशी मोदी-शहांची माणसे संधान बांधून आपल्याच देशबांधवांच्या विरोधात कारवाया करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी हे वक्तव्य मुंब्र्यातील शाहीन बाग येथील जनआंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विधान केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदी-शहांसारखी म्हणताना त्यांनी संपूर्ण गुजराती समाजाला गद्दार ठरवले आहे. सरदार पटेलांनी जे पद भूषविले होते त्याच पदावर अमित शहांसारखी व्यक्ती बसली आहे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.
मोदी यांनी इतरांची जन्मप्रमाणपत्र मागविण्याआधी आपल्या आईच्या जन्माचा दाखला आणावा, असे संतापजनक वक्तव्य केले आहे. शहा हे तुरुंगवास भोगून आले असल्याने या पदावर त्यांनी बसने हे अपमानजनक असल्याचे आजमी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर भारताचे सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले गृहमंत्री असून राजकीय एकसंघीकरणात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अमित शहा यांची त्यांच्या जागेवर नेमणूक करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याची जहरी टीका अबू आजमी यांनी शहांवर केली. मुंब्रा येथे जनतेला संबोधित करताना सर्व गुजराती समाजाला त्यांनी इंग्रजांचे दलाल म्हणून संबोधले.
