मलंगमधील दिशाचा हा लूक पाहून तुम्ही देखील व्हाल घायाळ


आपल्या ग्लॅमरल आणि हॉट लूकसाठी अभिनेत्री दिशा पटनी ओळखली जाते. तिचा हाच ग्लॅमरस अंदाज आपल्याला तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या मलंग चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसला होता. त्यातच आता तिने पुन्हा एकदा या चित्रपटातील बिचवरचा आपला हॉट फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

Some more #malang❤️🧜🏻‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


सप्सेन्स आणि थ्रिलरने भरलेला असा ‘मलंग’ चित्रपटाचा ट्रेलर आहे. दिशा पटनीसोबत यामध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमु यांच्या मुख्य भूमिका आहेत. या ट्रेलरमध्ये प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या जीवावर उठलेले पाहायला मिळत असल्यामुळे नेमका कोण कोणाचा शत्रु आहे, याचे रहस्य या चित्रपटात दडलेले आहे.

View this post on Instagram

#malang🧜🏻‍♀️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर दिशाच्या बोल्डनेसचीही चर्चा झाली. प्रेक्षकांना तिचे पात्र हे अधिक कोड्यात टाकणारे असल्यामुळे या चित्रपटात तिची नेमकी काय भूमिका आहे, हे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर समजेल. तिने त्यापूर्वी शेअर केलेल्या बिकनी लुकवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर २ लाखापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत.


काही दिवसांपूर्वीच दिशा आणि आदित्यवर चित्रीत झालेले शिर्षकगीत देखील रिलीज करण्यात आले होते. हे गाणे वेद शर्माने गायले तसेच कंपोझ देखील केले आहे. मोहित सुरीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मलंग’ ७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment