वैज्ञानिकांनी चक्क हवा, पाणी आणि विजेपासून बनवले अन्न

फिनलँडच्या वैज्ञानिकांनी हवा, पाणी आणि विजेपासून एक नवीन घट ‘सॉलेन’ बनवला असल्याचा दावा केला आहे. हे भविष्यातील अन्न ठरू शकते. याला ‘थिन एअर फूड’ असे नाव देण्यात आलेले आहे. याशिवाय हे पारंपारिक जेवणाच्या उत्पादनाच्या पद्धतीमध्ये क्रांती आणू शकते. या तयार करणाऱ्या सोलर फूड्स कंपनीचे म्हणणे आहे की, जगभरात वाढणाऱ्या अन्नाच्या मागणीचा हे एक पर्याय ठरू शकते. सोबतच पर्यावरणासाठी देखील फायदेशीर ठरेल.

कंपनीचे म्हणणे आहे की, धान्याच्या मागणीमुळे पृथ्वीवरील संसाधनांवर परिणाम होत आहे. धान्याचे उत्पादनासाठी करण्यात येणारी शेती ग्रीन हाउस उत्सर्जनाला कारणीभूत आहे. आकड्यंनुसार 14.5 टक्के ग्रीनहाउस गॅस प्राणी, शेती, गोमांस आणि म्हशींपासून उत्सर्जित होते.

सोलर फूड्स कंपनीचे सीईओ पासी वैनिक्का यांच्यानुसार, पृथ्वीवरील हवामान बदलापासून वाचण्यासाठी आपल्याला शेतीपासून लांब राहिले पाहिजे.

कंपनीच्या पायलट प्लांटमध्ये सॉलेन नैसर्गिक प्रोटिन तयार करण्यात येत आहे. दुसऱ्या प्रोटीन स्पलीमेंट्सप्रमाणे याला देखील चव नाही व हे कोणत्याही पदार्थाबरोबर अथवा जेवताना खाता येईल. याच्या उत्पादनात एक लहान कार्बन फुटप्रिंट असते. एका फरमेंटेशन टँकच्या आत बॅक्टेरिया विकसित करून ‘सॉलेन’ तयार केले जाते.

सोलर फूड्स पाण्यापासून वीज निर्माण करून हायड्रोजन बनवते. त्यानंतर कार्बन डायोऑक्साइडला हवेतून बाहेर काढते. याच कारणामुळे कंपनीने याला ‘थिन एअर फूड’ असे नाव दिले आहे.

वैनिक्का यांनी सांगितले की, या प्रक्रियेतून जी पाउडर तयार होते, त्यात 65 टक्के प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट असते. ही पाउडर ब्रेड आणि पास्त्यामध्ये देखील मिक्स करता येते. ही पाउडर अजून अनेक चाचण्यांमधून जाणार आहे. सध्या सोलर फूड्स कंपनी यूरोपियन स्पेस एजेंसीसोबत मिळून अंतराळवीरांसाठी सॉलेनचे उत्पादन करत आहे.

Leave a Comment