‘वाँटेड’च्या सिक्वेलचा फर्स्ट लूक रिलीज


‘दबंग -३’ला प्रेक्षकांच्या मिळालेल्या संमिश्रनंतर झालेला अपेक्षाभंग दूर करण्यासाठी सलमान खान आता ‘राधे’ हा नवा अॅक्शनपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ईदच्या मुहुर्तावर हा चित्रपट रिलीज करण्यात येणार आहे. या नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.


सलमान खान ‘मोस्ट वाँटेड भाई राधे’ या पोस्टरमध्ये अॅक्शन अंदाजात दिसत आहे. प्रभू देवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून तर सलमानचा भाऊ सोहेल खान याने निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे चित्रपटाच्या कथानकाबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहिर केलेली नाही. परंतु ‘राधे’ हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जात आहे. सलमानने या चित्रपटात राधे ही व्यक्तिरेखा साकारली होती. यावरुनच या आगामी चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment