
नवी दिल्ली – मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल असून या ईडीकडून आणखी एक कारवाई या प्रकरणात करण्यात आली आहे. ईडीने वढेरा यांचे सहकारी असलेल्या एका अनिवासी भारतीय उद्योजकाला अटक केली आहे. या उद्योजकाचे सी.सी. थंपी असे नाव असून, लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात थंपी यांनी गुंतवणूक करण्यास वढेरा यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
मनी लॉड्रिंगप्रकरणी वढेरांना मदत करणाऱ्या उद्योजकाला ईडीने केली अटक
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रॉबर्ट वढेरा यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीने याच प्रकरणात सी.सी. थंपी यांना अटक केली आहे. थंपी हे अनिवासी भारतीय उद्योजक असून, वढेरांचे ते निकटवर्तीय सहकारी आहे. वढेरा यांना लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास त्यांनी मदत केल्याचा आरोप आहे. दुबईत थंपी यांची स्कायलाईट एझेडई नावाची कंपनी आहे. वढेरांच्या नावे या कंपनीचे भारतात असलेल्या कंपनीत शेअर आहेत.
ईडीच्या तपासाला अनेक देशातून करण्यात आलेल्या बँकिंग व्यवहाराच्या पावत्यांमुळे दिशा मिळाली आणि थंपी यांच्या अटकेपर्यंत ती पोहोचली. ईडीने केला वढेरा आणि भंडारी यांच्यासोबत जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पुरावा असल्याचा दावा आहे.
