उबर इट्सची झोमॅटोकडून खरेदी

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने भारतातील आपला बाजार अधिक वाढवण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. झोमॅटोने प्रतिस्पर्धी फूड डिलिव्हरी कंपनी उबर इट्सचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. हा करार केवळ भारतासाठी झाला आहे. झोमॅटोने केवळ भारतातील उबर उट्सचे अधिग्रहण केले असून, इतर देशांमध्ये उबर इट्स सुरू राहील.

थोडक्यात, आता उबर इट्सवरून जेवण ऑर्डर करता येणार नाही. उबर इट्सने मेलद्वारे आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली.

माहितीनुसार, दोन्ही कंपन्यांमधील हा करार काल रात्री 3 वाजता पार पडला व सकाळी 7 नंतर उबर इट्सचे ग्राहक झोमॅटो अ‍ॅपवर शिफ्ट होण्यास सुरू झाले. या करारानंतर देखील उबर इट्सचे कंपनीत 9.9 टक्के शेअर असतील. हा करार 300 ते 350 मिलियन डॉलर्सचा (जवळपास 2500 कोटी रुपये) आहे.

https://twitter.com/UberEats_IND/status/1219446378994290688

झोमॅटो सध्या भारतातील क्रमांक एकची फूड डिलिव्हरी कंपनी असून, देशातील 500 पेक्षा अधिक शहरांमध्ये कंपनी आपली सेवा देते.

मागील काही दिवसांपासून उबर इट्सने भारतातील अनेक शहरांमध्ये आपला विस्तार केला होता. उबर इट्सकडून प्रतिस्पर्धी कंपन्या झोमॅटो आणि स्विगीला टक्कर मिळत होती. उबर आता भारतात कॅब बिझनेस वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. देशातील 50 शहरात उबरची कॅब सेवा असून, कंपनी ही संख्या 200 वर नेणार आहे.

Leave a Comment