चीफ जस्टीस बोबडे क्रिकेट मैदानावर


फोटो सौजन्य झी न्यूज
नागपूर येथे दोन दिवसांच्या भेटीसाठी आलेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे याचे वेगळे रूप रविवारी नागपूरकरांना पाहायला मिळाले. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यात मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी फलंदाजी करून सर्वाधिक धावा केल्या. १५ शतकांच्या या मैत्री सामन्यात त्यांनी १८ धावा काढल्या.

ऑल जज इलेव्हन विरुद्ध हायकोर्ट बार असोसिएशन ११ असा हा सामना झाला. त्यात बाकी वकील आणि जज सामील झाले होते. एएनआयने या संदर्भातला एक व्हिडीओ जारी केला आहे. शरद बोबडे डावखुरे फलंदाज असल्याचे त्यात दिसले आहे. बोबडे यांनी १८ धावा काढल्या तरी त्यांच्या ऑल जज संघाला हायकोर्ट बार असोसिएशन इलेव्हन करून पराभव पत्करावा लागला. यावेळी आपल्या आवडीविषयी बोलताना न्यायमूर्ती बोबडे यांनी त्यांना मोटरसायकलवरून फिरायला आवडते आणि रॉयल एन्फिल्डची बुलेट त्यांची आवडती मोटरसायकल असल्याचे सांगितले.

Leave a Comment