ग्लॅमरस हिना खानच्या ‘हॅक’चा ट्रेलर रिलीज


छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री हिना खान लवकरच एका थ्रिलर चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘हॅक’ असे असून या चित्रपटात हिनाचा ग्लॅमरस आणि बोल्ड लुक पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.


मागील बऱ्याच दिवसांपासून ‘हॅक’च्या ट्रेलरची चाहत्यांना आतुरता होती. आपली वैयक्तिक माहिती हॅक करून त्याचा गैरवापर करून ब्लॅकमेल करणाऱ्या क्रुर व्यक्तीचा चेहरा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. या ट्रेलरमध्ये आजकालचे तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत झाले आहे. पण, जेव्हा याच तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊ लागतो, तेव्हा त्याचे काही दुष्परिणामही पाहायला मिळतात. याचीच झलक दिसून येते.

अशाप्रकारच्या घटना खऱ्या आयुष्यातही घडत असल्यामुळेच आपली कोणतीही माहिती इंटरनेटवर जपून वापरावी, असा संदेश हिना खान ट्रेलर संपल्यानंतर देताना दिसते. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले असून ७ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment