बिझनेस क्लासमधून प्रवासासाठी या पठ्ठ्याने लढवली अफलातून शक्कल

अनेकांना विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करावा वाटत असतो. कारण हा विमानातील सर्वोत्तम भाग असतो. सर्व सोयीसुविधा, चांगले खाणे, स्पेशल सीट मिळते. याच बिझनेस क्लासमधून प्रवास करण्यासाठी एका पठ्ठ्याने मात्र भन्नाट कल्पना लढवली. आपला पाय तुटल्याचे नाटक करत त्याने चक्क इकोनॉमी सीटच्या तिकिटावर मजेशीरपणे बिझनेस क्लासचा प्रवास केला.

जॅमी झू नावाचा एक सोशल मीडिया स्टार आहे. ऑस्ट्रेलियात राहणारा जॅमी कॅथी पॅसिफिकचा प्रवास करणार होता. मात्र त्याच्या डोक्यात काहीतरी भलतचे सुरू होते.

सर्वात आधी त्याने मून बूट घेतले. त्यानंतर तो आपल्या इकोनॉमी सीटवर जाऊन बसला. मात्र त्याच्या पायात मून बूट असल्याने तेथे त्याला बसता आले नाही. त्याने ही गोष्ट फ्लाइट अटेंडेंला देखील सांगितली व दुसऱ्या ठिकाणी बसता येईल का असे विचारले. पाय तुटला असल्याने हा बूट घातल्याचे देखील त्याने सांगितले.

प्लाइट अटेंडेटने आपल्या सहकार्यांशी चर्चा करून जॅमीला बिझनेस क्लासमध्ये ट्रांसफर केले. इकोनॉमी क्लासच्या तिकिटावर जॅमीने बिझनेस क्लास प्रवासाचा आनंद घेतला. त्याला जेवण देखील बिझनेस क्लासचे मिळाले.

या घटनेचा संपुर्ण व्हिडीओ देखील त्याने युट्यूबवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Leave a Comment