आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधानचा ट्रेलर तुमच्या भेटीला


बॉलिवूडला सलग सात हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेता आयुष्मान खुरानाच्या आगामी शुभ मंगल ज्यादा सावधानचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट एक सामाजिक संदेश देणारा असेल याचा अंदाज प्रेक्षकांना चित्रपटाच्या नावावरून आणि पोस्टरवरून होता. आयुष्मान खुराना या चित्रपटात पहिल्यांदा एका समलैंगिक मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.


आयुष्मानने ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज केली होती. आयुष्मानने या पोस्टरला कॅप्शन देताना लिहिले की, ‘कार्तिक का प्यार होकर रहेगा अमन! ‘ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट नवीन पोस्टरमध्ये दिसते. यात नीना गुप्ता, गजराज राव, जितेंद्र कुमार, मनुऋषि चड्ढा, सुनीता रजवार, मानवी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार एका पोस्टरमध्ये लग्नाच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांना खुर्चीवरून खाली पाडण्याचा आणि वेगळे करण्याचा प्रयत्न त्यांचे संपूर्ण कुटुंब करत आहेत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटातील क्लायमॅक्स सीन करताना दिसत आहेत.

आयुष्मान-जीतेंद्र ट्रेलरमधील एका सीनमध्ये एकमेकांना किस करताना दिसतात. हा सीन ट्रेलरमध्ये अचानक आल्यामुळे पाहताना अचानक धक्का बसतो. हा चित्रपट येत्या २१ फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. माझ्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटाही कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्र बसून पाहू शकता, असे आयुष्मानने म्हटले आहे.

Leave a Comment