आता डिझेल नाही तर चक्क पाण्यावर चालणार ट्रॅक्टर

भविष्यात ट्रॅक्टर डिझेल ऐवजी आता पाण्यावर चालणार आहे. गुजरातचे वैज्ञानिक आणि जिमपेक्स बायो टेक्नोलॉजीचे मिहिर जय सिंह यांनी एक विशेष किट तयार केले आहे. या किटचे फेब्रुवारीमध्ये प्रदर्शन केले जाईल. याच्या वापरामुळे केवळ देशातील शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल, याशिवाय वायू प्रदुषण देखील कमी होईल.

30 हॉर्स पॉवर ते 90 हॉर्स पॉवरपर्यंतच्या ट्रॅक्टर्सवर ही कीट लावली जाईल. किट डिझेल इंजिनला जोडले जाईल. पाइपद्वारे इंजिनमध्ये हायड्रोजन फ्यूल जाईल. जे इंजिनमधील दुसऱ्या इंधनाचा वापर कमी करेल व इंजिनला अधिक पॉवर देईल.

त्यांनी सांगितले की, या किटचा सर्वाधिक फायदा म्हणजे यामध्ये ट्रॅक्टर्सद्वारे होणारे प्रदुषण देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल. हे किट एच 2 इंधन सेल हायब्रिड सिस्टमपासून बनले आहे. महाराष्ट्र सरकारसोबत देखील त्यांचा करार झाला असून, सर्वात आधी पंजाबमध्ये हे किट सादर केले जाईल.

एच-2 इंधन सेल हायब्रिड तंत्रज्ञान काय आहे ?

एच-2 इंधन सेल हायब्रिड सिस्टम हायड्रोजन डिव्हाईस आणि ऑक्सिजनचे मिश्रण आहे. हे जनरेटिंग सेटची एफिशियंसी वाढते. हे किट इंजिनमध्ये कोणतेही बदल करता लावता येते. डिव्हाईस कधीही बंद करता येते व इंजिन तरी देखील सुरू राहील. यामुळे डिझेलमध्ये 40 ते 50 टक्के बचत होईल.

 

Leave a Comment