अहमदाबाद: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळाली शिक्षिका !


अहमदाबाद: एका अतिशय धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. कारण येथील २६ वर्षीय महिला शिक्षिकेने ८वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबतच पळ काढला आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. गांधीनगर पोलीस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार दाखल केली असून त्यात असे म्हटले आहे की, सरकारी शाळेतील एक २६ वर्षाची महिला शिक्षिका आपल्या १४ वर्षाच्या मुलाला घेऊन पळून गेली आहे.

तेथील उद्योग भवनमध्ये मुलाचे वडील हे काम करतात. याबाबत त्यांनी अशी माहिती दिली की, आपल्या मुलाला महिला शिक्षिकेने भुलवल्यानंतर मुलाला तिने स्वत:च्या जाळ्यात ओढले आणि नंतर त्याला पळवून नेले.’ सध्या हा मुलगा आठवीत शिकतो.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून अचानक बेपत्ता झाला. त्याची वर्ग शिक्षिका देखील त्याचवेळी बेपत्ता झाली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की, जवळपास वर्षभरापासून महिला शिक्षिका ही आठवीतील मुलाच्या संपर्कात होती. इतर मुलांपेक्षा ती अधिकच त्याच्या जवळ होती. याबाबत नुकतीच शाळा प्रशासनाला देखील माहिती मिळाली होती.

सध्या शाळेत शिक्षिका आणि विद्यार्थ्यामधील हे नाते चर्चेचा ठरला होता. याचा जेव्हा जास्त बोभाटा झाला तेव्हा हे दोघेही पळून गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, खूपच हैराण करुन सोडणारी ही घटना आहे, आपल्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत एक महिला शिक्षिका पळून गेली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम ३६३ च्या अंतर्गत गांधीनगरच्या कलोल शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment