2 माशांमुळे एका रात्रीत लखपती झाला मच्छिमार

नशीब जर सोबत असेल, तर एखादी व्यक्ती देखील क्षणात गरीबाची लखपती होऊ शकते. असेच काहीसे पाकिस्तानमधील एका मच्छिमारासोबत झाले आहे. कराचीमध्ये राहणारा एक मच्छिमार अरब सागरात मासेमारी करून पोट भरतो. मात्र एकेदिवशी त्याला असे दोन दुर्मिळ व महागडे मासे सापडले की, एकारात्रीत त्याचे नशीब बदलले.

मच्छिमाराने ते दोन मासे बाजारात विकले व त्याला त्याचे प्रत्येक 10-10 लाख रुपये मिळाले. पर्यावरणासाठी काम करणारी संस्था वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडनुसार, या माशांचा आकार दीड मीटर, वजन 30 ते 40 किलो आहे. या माशांची अनेक देशात मागणी आहे. खासकरून या माशांमध्ये आढळणाऱ्या एअर ब्लेडरची.

हाँगकाँगमध्ये या माशाचा एअर ब्लेडर जवळपास 2 लाख डॉलरमध्ये विकला जातो. तर चीनमध्ये या माशाला शुभ मानले जाते. हा मासा सव्वा प्रजातीचा असून, हा एक दुर्मिळ मासा आहे. वेगवेगळ्या जागेवर या माशाची वेगवेगळी नावे आहेत.

या माशाचे वैज्ञानिक नाव ‘अरगायरोसोम्स जापोनिकस’ आहे. या माशांचा उपयोग औषध कंपन्या देखील करतात. औषध कंपन्या या माशासाठी हवी ती किंमत द्यायला तयार असतात. या प्रजातीचे मासे ब्लूचिस्तान आणि सिंध प्रांतात आढळतात.

Leave a Comment