Video : विमानात बूट सुकवण्यासाठी प्रवाशाने लढवली भन्नाट शक्कल

विमानात बसलेल्या एका प्रवाशाने आपली बुट सुकवण्यासाठी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती बुट सुकवण्यासाठी विमानाच्या एसी वेंटद्वारे निघणाऱ्या हवेचा वापर करत आहे.

एका पेसेंजर शेमिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती आपल्या सीटवर बसून हातात बूट पकडून सुकवण्यासाठी एअर वेंटच्या खाली पकडत आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक युजर्सने पाहिले असून, शेकडो युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, संपुर्ण कॅबिनमध्ये सुंगध पसरवण्याची ही चांगली कल्पना आहे.

Leave a Comment