राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शिवसेनेत प्रवेश


कोल्हापूर – मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईच्या साक्षीने राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शिवबंधन बांधले.

यड्रावकर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून शिरोळ विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी त्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला होता. दरम्यान, उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असताना अंबाबाईचे दर्शन घेऊन यड्रावकर यांनी सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेच्या आमदारांची संख्या आता दोन झाली आहे. यड्रावकर यांच्या पक्षप्रवेशावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Comment