गृहमंत्र्यांनी लावला आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला ‘ब्रेक’


मुंबई : मुंबईच्या नाईट लाईफबाबत राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या नाईट लाईफला 26 जानेवारीपासून सुरूवात होणार होती. पण हे स्वप्न आता गृहमंत्र्यांकडून लांबणीवर जाताना दिसत आहे. यामुळे पर्यटन मंत्र्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय लांबणीवर जाणार का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिले आहे.

याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीपर्यंत ‘नाईट लाईफ’ बाबतचा निर्णय घेता येणार नाही. याचा पोलीस यंत्रणेवर किती ताण पडू शकतो याची पूर्ण माहिती घेऊनच राज्य शासन निर्णय घेईल. तसेच यंत्रणा पुरेशी आहे की नाही हे बघून निर्णय घेतला जाणार आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक मुंबईत येतात. त्यामुळे हा चांगला निर्णय असल्याचे अनिल देशमुख म्हणाले आहेत. पण 26 जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू होईल असे वाटत नसल्यामुळे याचा निर्णय येत्या बुधवारी कॅबिनेट आहे त्यात घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment