रिलीज झाले प्रियंकाच्या नवऱ्याचे नवे गाणे


जोनास ब्रदर्स यांच्याकडे हॉलीवूडमधील एक लोकप्रिय बँड तसेच संगीतकार म्हणून पहिले जाते. आता जोनास ब्रदर्सचे बऱ्याच प्रतीक्षेनंतर नवे गाणे ‘What A Man Gotta Do’ रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे निक जोनाससोबत या गाण्यात प्रियंका चोप्रादेखील दिसून येत आहे. हे गाणे सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्याला चाहत्यांनी पसंती दिल्याचे लक्षात येत आहे. मागील बर्‍याच दिवसांपासून या गाण्याबद्दल चर्चा सुरू होती. यापूर्वी या गाण्याचे काही फोटो प्रियंका चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

या गाण्याचे बोल, व्हिडीओ, डान्स जितका अप्रतिम आहे, तितकाच यातील निक आणि प्रियंकाचा सेक्सी डान्सही चाहत्यांना आवडला आहे. निक जोनास या गाण्याच्या सुरुवातीला पॅंटशिवाय फक्त शर्ट घालूनच नाचताना दिसत आहे. या संपूर्ण गाण्यात तो आपली पत्नी प्रियंका चोप्राला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी प्रियंकाही निकसोबत पॅंटशिवाय नाचू लागते.

या गाण्यात निक आणि प्रियंका यांच्यासह निक जोनासचा भाऊ, जो जोनासदेखील आपली पत्नी सोफी टर्नरसोबत नाचताना दिसत आहे. तसेच या गाण्यात केविन-डेनियल यांची जोडी देखील आहे. अशाप्रकारे या एका गाण्यात संपूर्ण जोनास कुटुंब दिसून येत आहे. या बँडचे यापूर्वीही ‘Sucker’ हे गाणे रिलीज झाले होते. या गाण्यातही सर्व जोनास भाऊ आपल्या पत्नींसोबत दिसले होते. त्या गाण्यालाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. कदाचित ‘Sucker’ चे यश पाहूनच जोनस ब्रदर्सनी पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला गाण्यात एकत्र आणले आहे.

Leave a Comment