या देशामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या लग्नावर मिळत आहे बंपर डिस्काउंट

पाकमधील एका मॅरिज हॉलकडून लग्नासाठी देण्यात आलेली ऑफर सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये सुरू झालेल्या एका नवीन मॅरिज हॉलने दुसरे, तिसरे आणि चौथे लग्न करणाऱ्या विवाहित पुरुषांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत दुसरे लग्न करणाऱ्यास 50 टक्के, तिसरे लग्न करणाऱ्या 75 टक्के आणि चौथ्या लग्नाचे रिसेप्शन मोफत दिले जाईल. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हा मॅरिज हॉलच्या मालकाची एक अट पुर्ण करावी लागेल.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मॅरिज हॉलचा मालक ही खास ऑफर सांगत आहे.

https://twitter.com/TheBadG22879006/status/1216000907034251265

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मात्र विवाहित पुरूषाला एक अट पुर्ण करावी लागेल. ही अट म्हणजे स्वतः पुरुषाच्या पहिल्या पत्नीने मॅरिज हॉलमध्ये लग्नाचे बुकिंग करावे. जर पहिल्या पत्नीने हॉल बुकिंग केले नाही तर ऑफर मिळणार नाही.

Leave a Comment