तुम्ही पाहिले का जवानी जानेमनचे नवे गाणे


सध्या तानाजी चित्रपटातील आपल्या ग्रे शेडमधील भूमिकेमुळे अभिनेता सैफ अली खान खूपच चर्चेत असतानाच त्याचा नवा चित्रपट जवानी जानेमन देखील चर्चेत आहे. पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सैफ अली खान या चित्रपटात तिच्या वडीलांची भूमिका साकारत आहे. यामध्ये बापलेकीची मजेदार कथा दाखविण्यात येणार आहे.

या चित्रपटातील पहिले गाणे ‘गल्ला करदी’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले. ज्यामध्ये सैफ आपला जलवा दाखवत आहे. तर येथे आलियाचा हॉटनेस देखील पाहायला मिळतो आहे. जवानी जानेमन हा चित्रपट या महिन्याच्या ३१ तारखेला रिलीज होणार आहे.

Leave a Comment