अंतराळवीर बनण्यासाठी आवश्यक आहेत या गोष्टी

अंतराळाचा प्रवास करणे हे आपल्यातील अनेकांचे स्वप्न असते. मात्र अंतराळ प्रवासी बनणे एवढे सोपे नाही. यासाठी तुमच्याकडे अनेक गुण, कौशल्य असणे गरजेचे असते. त्वरित निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे हवी. सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत तुमचे आरोग्य अधिक चांगले हवे. एक अंतराळ प्रवासी बनण्यासाठी काही ठराविक गोष्टी असतात, ज्याला ‘द राइट स्टाफ’ म्हटले जाते.

Image Credited – Amar ujala

सर्वसाधारणपणे अंतराळवीर हे एअरफोर्सचे सर्वोत्तम पायलट असतात. 1950 मध्ये नासाने देखील आपला पहिला पायलट एअरफोर्समधूनच निवडला होता. सोव्हियत संघाने देखील असेच केले होते. फरक एवढाच आहे की, सोव्हियत संघाने यात महिलांचा समावेश केला होता. सोबतच अंतराळ प्रवाशाची उंची 5 फूट 6 इंच पेक्षा अधिक नसावी असा नियम होता.

Image Credited – Amar ujala

जवळपास 60 वर्षांच्या संशोधनानंतर मानव अंतराळात जात आहे. मात्र तेथे जाण्यासाठी अटी आजही त्याच आहेत. सर्वोत्तम लोकांना अंतराळात पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वसामान्य व्यक्ती अंतराळात सहज राहू शकत नाही.

जमिनीवर आपल्या ऑक्सिजन मिळतो. मात्र पृथ्वीपासून लांब अंतराळात कृत्रिम ऑक्सिजनवर राहावे लागते. ब्रम्हांडामधील रेडिएशन सहन करावे लागते. याचा परिणाम थेट शरीरावर होऊ शकतो, शरीर कमकुवत वाटते, मळमळते. डोळे कमकुवत होतात.

Image Credited – Amar ujala

अंतराळवीर ल्यूका परमितानो आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जवळपास साडे पाच महिने राहिले. ते सांगतात की, जसजसे दिवस जातो तसतसे तुमचे पाय अधिक कमकुवत आणि बारीक असल्याचा अनुभव होतो. चेहरा गोल होतो. पुन्हा पृथ्वीवर आल्यावर सर्व नॉर्मल होण्यासाठी देखील वेळ लागतो. अंतराळात सुरूवातीच्या दिवसात एकाच दिशेने चालावे लागते. सहा महिन्यानंतर हळूहळू दुसऱ्या दिशेने फिरायला सुरू करता. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीर हवेतच असतात. अंतराळात अधिक काळ टिकणे सोपे नाही.

Image Credited – Amar ujala

अंतराळात रिसर्चर व्यवस्थित राहू शकतील अशी व्यवस्था करण्यावर विचार सुरू आहे. यासाठी त्यांनी रेडिएशनपासून वाचवणे सर्वात महत्त्वाचे आहे. अंतराळात वस्ती स्थापन करण्याविषयी चर्चा झाली आहे.

Image Credited – Amar ujala

अमेरिकेचे न्यूरो सायंटिस्ट रॉबर्ट हेम्पसन यांना असे वाटते की, अंतराळात वस्ती स्थापन करणे सोपे नाही. यासाठी खूप वेळ लागेल. तोपर्यंत अंतराळात जाणाऱ्या लोकांनाच त्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी तयार करण्यात यावे. अंतराळात वस्ती करून राहणे खूप धोकादायक आहे. समजा एखाद्या व्यक्तीला अशा कॉलनीमध्ये पाठवण्यात आले. तर त्याची पुढील पिढी पृथ्वीवर राहू शकणार नाही. त्यांचे शरीर अंतराळातील वातावरणाशी एकरूप होईल. त्यांचे आयुष्य पृथ्वीवरील लोंकापेक्षा वेगळे असेल.

Leave a Comment