
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्यापेक्षा उद्धव ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर तिप्पट खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली असून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा झाला. तब्बल दोन कोटी ८९ लाख ७ हजार ३७४ रुपये या सोहळ्यावर खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला लागले एवढे पैसे
देवेंद्र फडणवीस सरकारच्या २०१४ साली वानखेडे स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्याला ९८ लाख ३७ हजार ९५० रुपये खर्च झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फुलांच्या सजावटीचा खर्च ३ लाख ३ हजार २५७ रुपये तर इलेक्ट्रिक कामासाठीचा खर्च २ कोटी ७६ लाख ४ हजार ११७ रुपये झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. या महत्वाचे म्हणजे २०१२ पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा खर्च किती झाला याची माहिती नाही. कारण खर्चाच्या फाईल्स २१ जून २०१२ ला मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले आहे.
