अॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेजोस यांना भेटणार नाही नरेंद्र मोदी!


नवी दिल्ली- आजचा अॅमेझॉनचे फाउंडर-सीईओ जेफ बेजोस यांच्या भारत दौऱ्याचा शेवटचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी बेजोस यांना भेटणार नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामागे कॉम्पिटीशन कमीशन ऑफ इंडिया (सीसीआय) विरुद्ध अॅमेझॉन चौकशी करत आहे आणि बेजोस यांचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने मोदी सरकारची निंदा केली अशी कारणे सांगितली जात आहेत.

मोदींना ग्लोबल गोलकीपर पुरस्कार मिळाल्याची निंदा बेजोस यांच्या वॉशिंग्टन पोस्टने केली होती. मोदींना भेटण्याची वेळ बेजोस यांनी मागितली होती. बुधवारी भारताचे बेजोस यांनी कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, 21व्या शतक भारताचे आहे. तसेच, त्यांनी 7 हजार 100 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 71 हजार कोटी रुपयांच्या मेक इन इंडिया प्रोडक्ट्सना एक्सपोर्ट करण्याची घोषणा केली होती.

तरीदेखील बेजोस यांना पंतप्रधानांनी वेळ दिली नाही. आतापर्यंत मोदी सरकारच्या अनेक धोरणांची बेजोस यांचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने निंदा केली आहे. वृत्तपत्राने कलम 370 हटवल्यानंतर बातम्या आणि विचारांवर आधारित एक सीरीज प्रकाशित केली होती. मोदींना बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनकडून ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड मिळाल्याचीही निंदा वृत्तपत्राने केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच भारतीय पत्रकार बरखा दत्त आणि राणा अय्यूब यांचे याबाबतचे विचार वॉशिंग्टन पोस्टने प्रकाशित केले होते. वृत्तपत्राने 13 डिसेंबरला एक लेख प्रकाशित केला होता, ज्याचे शीर्षक भारताचा नवा कायदा मुस्लिमांचे नागरिकत्व हिसकावू शकतो असे होते.

Leave a Comment