Viral : बादशाही पोशाख आणि हातात तलवार घेऊन पाक पत्रकाराची हटके रिपोर्टिंग

पाकिस्तानी पत्रकार चांब नवाब यांची रिपोर्टिंगचा एक व्हिडीओ काही वर्षांपुर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांची ती हटके रिपोर्टिंग आजही लोकांच्या लक्षात आहे. अशाच आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे.

पाकिस्तानच्या जिओ न्यूज चॅनेलचे रिपोर्टर अमीन हफीज चक्क महाराजाचा पोशाख आणि हातात तलवार घेऊन रिपोर्टिंग करत आहेत.

अमीन हफीज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले आहे. तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

अमीन हफीज हे तेच पत्रकार आहेत, ज्यांचा डिसेंबर 2018 मध्ये गाढवावर बसून रिपोर्टंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Leave a Comment