100 फुटांनी वाढणार इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची


मुंबई : मुंबईतील दादर परिसरातील इंदू मिलमधल्या प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची वाढवण्याबाबत ठाकरे सरकारने नवा प्रस्ताव आणला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची यापूर्वी 250 फूट निश्चित करण्यात आली होती. ती वाढवून आता साडे 350 फूट होणार आहे. याबाबत आज कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, उंची वाढवल्यामुळे पुतळ्याचा खर्च देखील वाढणार आहे. परिणामी 709 कोटींचा खर्च आता 990 कोटींवर जाणार आहे. 100 फुटांचा या स्मारकाचा पाया असेल. त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिल 2020 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा केला असला तरी स्मारकाची एक वीटही अद्याप रचली गेलेली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम 14 एप्रिल 2020 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. अजित पवारांनी 2 जानेवारी रोजी इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मारकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन या महिन्यात सर्व परवानग्या मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सर्व अडचणी दूर करुन स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही म्हणाले.

Leave a Comment