रितेश देशमुखने मानले अजित पवारांचे आभार


मुंबई – काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरविकास विभागाला त्यासंदर्भातील सूचना दिली. विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देखमुखने या निर्णयानंतर अजित पवारांचे आभार मानले आहेत.

ट्विटरवर रितेशने आपल्या भावना व्यक्त केल्या. आज तुम्ही विलासराव देशमुखांनी केलेल्या कामाला मान दिला. त्याबद्दल मुलगा म्हणून दादा मी सदैव आपला आभारी राहीन, असे ट्विट रितेश देशमुखने केले आहे. मंगळवारी राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची अजित पवार यांनी बैठक घेतली होती. राज्याच्या परिवहन विभागाला यावेळी सुधारणासंदर्भात सूचना दिल्याचे ट्विट अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी याच ट्विटरमध्ये ‘मुंबईतील इस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

Leave a Comment