Viral : चक्क कुत्र्याने व्यक्तीसोबत गायले रानू मंडल यांचे हे गाणे

रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांनी हॅप्पी हार्डी अँड हीर या चित्रपटासाठी गायलेले गाणे ‘तेरी मेरी कहानी’ आठवते का ? हे गाणे खूप चर्चेत आले होते. मात्र आता पुन्हा एकदा एका विचित्र कारणामुळे हे गाणे पुन्हा व्हायरल होत आहे.

हे गाणे गाताना व हार्मोनियम वाजवतानाचा एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये एक कुत्रे देखील त्या व्यक्तीबरोबर गाणे गाताना दिसत आहे. व्यक्ती हार्मोनियम वाजवताच कुत्रे देखील आपल्या आवाजात सुर लावत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

https://www.facebook.com/subir.khan.35/videos/1800295480106288/

व्हिडीओतील व्यक्ती जसजसे गाणे गात आहे, तसतसे कुत्रे देखील त्याच्याबरोबर ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर या कुत्र्याचे कौतूक होत आहे.

https://twitter.com/chandan27648045/status/1217310169580748800

फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. तर अनेक युजर्सनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment