बर्फात 4 तास चालत जवानांनी गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले, मोदींनी केले कौतूक

हिमवृष्टी आणि साचलेला बर्फ अशा परिस्थितीत भारतीय सैन्याच्या जवानांनी एका गर्भवती महिलेला 4 तास चालत हॉस्पिटलमध्ये नेण्याची कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याच्या या कामगिरीची प्रशंसा करत ट्विट केले. मोदींनी जम्मू-काश्मिर आणि एलओसीवर तैनात चिनार कॉर्प्सच्या जवानाच्या वीरतेला व त्यांच्या कामाचे कौतूक केले.

जवानांनी बर्फाच्छादित प्रदेशात गर्भवती महिलेला खांद्यावर उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. चिनार कॉर्प्ससाठी ट्विट करत मोदींनी लिहिले की, आपले सैन्य वीरता आणि कार्यासाठी ओळखले जाते. एवढेच नाहीतर भारतीय सैन्याचा सन्मान सैनिकांमध्ये असलेल्या मानवतेसाठी देखील केला जातो. जेव्हा कधीही सैन्याची गरज असते, त्यावेळी सैन्याने जमेल ते प्रयत्न केले आहेत. मी शमीमा (महिला) व बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.

याआधी चिनार कॉर्प्सने ट्विटद्वारे जवानांच्या या कामगिरीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणाक हिमवर्षाव होत असताना शमीमाला त्वरित हॉस्पिटलमध्ये न्यायचे होते. जवळपास 4 तास बर्फात चालत सैन्याच्या 100 जवानांनी आणि 30 नागरिकांनी मिळून महिलेला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. हॉस्पिटलमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.

सोशल मीडियावर युजर्सनी देखील जवानांच्या या कामगिरीचे कौतूक केले.

 

Leave a Comment