अमेरिकन नौदलाने योगाबद्दल केले हे ट्विट

मागील काही वर्षात योगा हा जगभरात पसरला आहे. अमेरिकन नौदलाने देखील भारताच्या या प्राचीन परंपरेचा स्विकार केल्याचे पाहिला मिळत आहे. अमेरिकन नौदलाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो ट्विट केला आहे. यामध्ये दिसत आहे की, नाविक जहाजेत योगासन करत आहेत.

अमेरिकन नौदलाने फोटो शेअर करत योगाचे फायदे देखील सांगितले. फोटोत दिसत आहे की, योगा शिक्षकासह 7 जण योगासन करत आहे व पाठीमागे समुद्र आहे.

नौदलाने लिहिले की,  नौदलाला समुद्रात उत्तम ठेवण्यासाठी नाविकांना त्यांचे मन आणि शरीराचा योग्य वापर करण्यामध्ये योगाचा देखील हात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ?

या ट्विटला आतापर्यंत 17 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत. तर हजारो युजर्सनी रिट्विट केले आहे.

2018 मध्ये योगा जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, अमेरिकन संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक समस्या दूर करण्यामध्ये योगाची भूमिका महत्त्वाची आहे.

Leave a Comment