या पठ्ठ्याने गेम खेळत एका महिन्यात कमी केले 9 किलो वजन

वजन कमी करण्यासाठी लोक भरपूर प्रयत्न करतात. मात्र सर्वांनाच त्यात यश येत नाही. मात्र फिलिपाइन्स येथे राहणाऱ्या एका मुलाने दावा केला आहे की, चक्क व्हिडीओ गेम खेळल्याने एका महिन्यात त्याचे वजन 9 किलो कमी झाले आहे. ग्राफीक आर्टिस्ट असलेल्या मिगुई गेब्रिएलने आपल्या फेसबुक अकाउंटवर गेम खेळण्याआधी आणि त्यानंतर एका महिन्यानंतर असे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की त्याचे वजन कमी झाले आहे.

मिगुईनुसार, त्याने निनटेंडोची नवीन व्हिडीओ गेम रिंग फिट एडव्हेंचर खेळत वजन कमी केले. या गेमला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की, ज्यामध्ये प्लेयर तासंतास एका जागेवर बसून राहण्याऐवजी इकडे तिकडे फिरतो व फिरताना देखील असे स्टेप्स देण्यात येतात, ज्याद्वारे त्याचा व्यायाम देखील होतो. याचाच फायदा मिगुईला मिळाला.

मिगुईने अनेकदा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यात यश आले नाही. यावेळी गेम खेळताना व्यायाम होत असताना त्याने रात्रीचे जेवण देखील बंद केले व डायटमधून कार्बोहायड्रेट्स कमी केले.

त्याने सांगितले की, दिवसाला केवळ 25 मिनिटे गेम आणि डाइटमध्ये बदल केल्याने वजन कमी झाले. आधी वजन 78 किलो होते, जे आता 69 किलो आहे. ही गेम थोडी महागडी आहे, मात्र व्यायामासाठी ठीक आहे.

रिंग फिट एडव्हेंचर एक अॅक्शन गेम आहे. यामध्ये व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे एक्टिव्हिटी करावी लागते. युजर अॅक्शन करत असताना व्यायाम देखील होतो.

Leave a Comment