बाईकवरून पडल्यानंतर कार खाली दबली महिला, लोकांनी काय केले पहा

चीनमधील एका अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर कारखाली फसलेल्या दुचाकीचालक महिलेला वाचवण्यासाठी आजुबाजूची लोक कार उचलताना दिसत आहे. ही घटना गुआंग्शी झुआंग येथील लिजुओ शहरातील आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला इलेक्ट्रिक बाईक चालवत असताना अचानक तोल जाऊन रस्त्यावर पडते. त्यानंतर मागून येणाऱ्या वेगवान कार खाली महिला अडकते. कारचालकाला समजताच तो पुढे जाऊन कार थांबवतो.

यावेळी आजुबाजूचे काही त्याठिकाणी धावतात व कार उचलून त्या महिलेला बाहेर काढतात. 30 पेक्षा अधिक लोक ही कार उचलतात व महिलेला वाचवतात.

कार खालून बाहेर काढल्यानंतर महिलेला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, महिलेला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.

Leave a Comment