छत्रपतींशी मोदींची तुलना करणाऱ्यांच्या चुकीला माफी नाही


मुंबई – भाजपने शनिवारी दिल्लीतील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. यावरुन मोठे वादंग निर्माण झाले आहे. या पुस्तकावरुन सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनीही निशाणा साधला आहे. कोणाशीही छत्रपतींची तुलना होऊ शकत नाही. हा अट्टहास करु पाहणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नसल्याचे मुंडे म्हणाले.

प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असे नाव आहे. भाजपसह नरेंद्र मोदी यांच्यावर यावरुन जोरदार टीका होत आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशित केल्याने मराठी जनांच्या भावना दुखावल्याचे मुंडे म्हणाले.

Leave a Comment