Video : महिलेच्या चॅलेंज पुढे लोक का झाले हतबल?

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे चॅलेंज व्हायरल होत असतात. कधी किकी चॅलेंज तर कधील वॅक्यूम चॅलेंज व्हायरल होते. एक असेच हटके चॅलेंज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे चॅलेंज अमेरिकन  महिला जिमनास्टने दिले आहे.

हे असे चॅलेंज आहे, ज्यात लोकांनी करण्याआधीच हार मानली आहे. जॅक्स क्रॅनिट्झ नावाच्या इंस्टाग्राम युजरने या चँलेंजचा व्हिडीओ शेअर केला आहे. याला न्यू फ्लेक्स चॅलेंज असे नाव देण्यात आले असून, प्रथमता पाहण्यात हे खूपच सोपे वाटते, मात्र करायला अवघड आहे.

जॅक्सने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तुमच्या त्या मित्रांना टॅग करा, जे हे करू शकतात. आतापर्यंत लाखो युजर्सनी हा व्हिडीओ पाहायला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जॅक्स आधी पोटावर झोपते व आपले दोन्ही हात कमरेच्या पाठीमागे ठेवते. त्यानंतर हात न सोडता ती पाय जमिनीला घासून उभी राहते. हे चॅलेंज पाहण्यास सोपे वाटत असले तरी करण्यास अवघड आहे.

Leave a Comment