चेहऱ्यावरील केस हटविण्याकरिता अवलंबा हे उपाय


चेहऱ्यावरील नकोसे असणारे केस कसे हटवावे हा तरुण मुली, किंवा महिलांच्या समोरील मोठा प्रश्नच असतो. हे केस हटविण्याकरिता अनेक उपाय उपलब्ध आहेत. त्यापैकी वॅक्सिंग, थ्रेडिंग, लेसरद्वारे केस काढून टाकणे असे अनेक उपाय साधारणपणे अवलंबले जातात. पण ह्या उपायांच्या व्यतिरिक्त घरच्याघरी काही उपाय करून चेहऱ्यावरील केस हटविता येऊ शकतात. ह्या उपायांच्या अवलंबाने चेहऱ्यावरील केसांची वाढ हलकी होऊन कालांतराने संपूर्णपणे बंद होते.

चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याकरिता एक उत्तम फेस पॅक घरच्याघरी तयार करता येतो. एका भांड्यामध्ये अर्धा कप बेसन, एक लहान चमचा हळद, एक लहान चमचा दुधावरची साय आणि अर्धा कप दूध हे सर्व एकत्र करून त्याची दाट पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्यावी. सुमारे अर्धा तास ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू द्यावी. त्यानंतर ज्या दिशेने केसांची वाढ असेल, त्याच्या विरुद्ध दिशेने चेहरा हळुवार गोलाकार चोळण्यास सुरुवात करावी. हा फेस पॅक चेहऱ्यावरून पूर्णपणे काढून टाकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. आठवड्यातून दोन वेळेला ह्या फेस पॅकचा वापर करावा.

एका बाऊल मध्ये एक मोठा चमचा पपईचा गर, अर्धा लहान चमचा हळद, आणि चार मोठे चमचे अॅलो व्हेरा जेल वापरून पेस्ट तयार करावी. आपल्या चेहऱ्यावर नकोश्या केसांची वाढ जिथे आहे, त्या भागावर ही पेस्ट लावून, सुमारे वीस मिनिटे राहू द्यावी. त्यानंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने चोळत पेस्ट चेहऱ्यावरून उतरवून टाकावी, व नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा.

एका मोठ्या लिंबाच्या रसामध्ये एक मोठा चमचा मध मिसळावा. हे मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावे. ह्या फेस मास्क मुळे चेहऱ्यावरील केसांची वाढ हलकी होत जाते आणि कालांतराने संपूर्णपणे थांबून जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment