तान्हाजी…चा बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशीही धमाका


बॉक्स ऑफिसवर अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोलचा चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरियरने सलग दुसऱ्या दिवशीही धमाका केला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १५.१० कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २० कोटी रुपये कमावल्याची माहिती बॉक्स ऑफिस इंडियाने दिली आहे. म्हणजेच दोन दिवसांत चित्रपटाने ३५ कोटींच्या जवळपास कलेक्शन केले आहे.


देशभरातील ३८८० स्क्रिन्सवर ‘तान्हाजी’ रिलीज झाला आहे. तर तो संपूर्ण जगभरात ४५४० स्किन्सवर रिलीज करण्यात आला आहे. अजय देवगन ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर अजय देवगनचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये अजय म्हणतो की, नमस्कार, मी अजय देवगन..जे प्रेम तुम्ही लोकांनी तान्हाजीला दिले आहे, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानतो. भारतीयांनी आणि भारताबाहेर राहणाऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी तान्हाजी मालसुरे यांनी केलेला त्याग पाहावा आणि जगाला सांगावे. सर्वांचे धन्यवाद, तान्हाजी यूनाइट्स इंडिया.

Leave a Comment