व्हायरल; हॉटेल बाहेरील बासरी वादकाने जिंकले शंकर महादेवन यांचे मन

बॉलिवूडचे प्रसिद्ध कम्पोजर आणि गायक शंकर महादेवन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका आसामची व्यक्ती अतिशय सुंदर बासरी वाजवत आहे. हा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

शंकर महादेवन सध्या आसाममध्ये आहेत. तेथेच त्यांनी एका हॉटेलबाहेर एका व्यक्तीला बासरी वाजवताना पाहिले. या व्यक्तीच्या बासरीच्या सुरांनी शंकर महादेवन यांचे मन जिंकले. या व्यक्तीचे नाव दिलीप हिरा असे आहे.

व्हिडीओमध्ये शंकर महादेवन देखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिलीप एवढ्या सुंदररित्या बासरी वाजवत आहे की, शंकर महादेवन देखील मंत्रमुग्ध होऊन जातात.

सोशल मीडियावर युजर्स या बासरी वादकाला ब्रेक देण्याची आवाहन करत आहेत.

Leave a Comment