Video : अवघ्या सेंकदात जमिनदोस्त झाली 18 मजली बेकायदेशीर इमारत

कोच्चीच्या समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या दोन बेकायदेशीर इमारती पाडण्यात आल्या आहेत. या इमारती पाडतानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या बहुमजली इमारती अगदी काही सेंकदात जमिनदोस्त झाल्या. इमारती ढेर झाल्यानंतर चारही बाजूला धुळीचा गोळा तयार झाला.

या बेकायदेशीर इमारती पाडण्यापुर्वी संपुर्ण भाग रिकामा करण्यात आला होता.

आधिकाऱ्यांनी सांगितले की, एर्नाकुलम जिल्हा कलेक्टर क्षेत्रातील दोन रहिवासी बेकायदेशीर इमारती पाडण्यात आल्या. 200 मीटर क्षेत्रातील रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम आधीच करण्यात आले होते. आजुबाजूच्या परिसरातील वाहतूक देखील थांबवण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार किनारपट्टीवरील नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या दोन्ही अपार्टमेंटला पाडण्यात आले.

एकूण 343 प्लॅट्साठी बुधवारीच अपार्टमेंटमध्ये विस्फोटक नेण्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. आजुबाजूच्या इमारतींचे कोणतेही नुकसान न पोहचवता अपार्टमेंट पाडण्याचे काम करण्यात आले.

 

Leave a Comment