छत्रपती संभाजी राजेंचे ‘सारथी’ च्या बचावासाठी उपोषण


पुणे – सारथी संस्थेच्या विद्यार्थीसह, खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी खासदार सुबोध मोहिते हे सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर राज्य सरकार मार्फत स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेची स्वायतत्ता अबाधित ठेवण्यात यावी. त्याचबरोबर सरकारकडून ही संस्था बंद पाडण्याचे रचण्यात येत असलेले षडयंत्र थांबविण्यात यावे, अशी मागणी करत या संस्थेसाठी निधीची तरतूद व्हावी या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.

छत्रपती संभीजी राजे यांनी मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्थेबाबत (सारथी) विविध आदेश काढून, संस्थेला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यासाठी आज पुण्यात लाक्षणिक उपोषणास सुरूवात केली आहे.


छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषणाअगोदर ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. त्यांनी सारथी संस्था वाचवण्यासाठी, मराठा समाजातील हक्कासाठी मी आयुष्यात पहिल्यांदा लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे सांगितले होते. उपोषणाच्या ठिकाणी सारथीचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे हे देखील उपस्थित आहेत. तर, राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे देखील उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत.

त्यांच्याबरोबर राज्यात सारथी संस्थेची विभागीय केंद्रे सुरू करण्यात यावी, राज्य यंत्रणेमार्फत सारथीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, मराठा कुणबी विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी द्या, ४ जून २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सारथीची स्वायतत्ता कायम ठेवावी आदी या मागण्यांचे फलक हाती घेऊन विद्यार्थी उपोषास बसले आहेत. विद्यार्थी वर्गासह सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित आहेत.

Leave a Comment