४६ वर्षाच्या हृतिकचे फिटनेस रहस्य


यंगस्टर्सचा आदर्श, फिटनेस आणि मर्दानी सौंदर्याचा पुतळा, प्रमाणबद्ध शरीरयष्टीचा बॉलीवूड हिरो हृतिक रोशनने त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा केला असून तरुणाईत फिटनेस क्रेझ वाढविण्यात त्याचे मोठे योगदान आहे. महिन्यापूर्वीच त्याची आशियातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवड झाली असून उंची, पिळदार शरीर आणि व्यक्तीमत्व यामुळे त्याची ग्रीक गॉड ऑफ बॉलीवूड अशी ओळख आहे.

एक काळ असा होता की चाचरत बोलणे आणि हाताला सहा बोटे यामुळे हृतिक मानसिक दृष्ट्या थोडा डिस्टर्ब होता. पण या आपल्या वैगुण्यावर त्याने ज्या जिद्दीने मात करून बॉलीवूड मध्ये स्वतःचे खास स्थान निर्माण केले त्यामुळे तो तरुणांचा आदर्श बनला. या साठी हृतिकने अतिशय काटेखोरपणे शरीर संपदा मिळविली आणि तेवढ्याच कडक डायटने ती उत्तम स्थितीत राखली. आजही तो वर्कआउट आणि डाइट अतिशय काटेखोरपणे पाळतो.

भरपूर घाम गाळणारा वर्क आउट केल्यानंतर किमान ४५ मिनिटे तो काहीही खात नाही. त्याच्या आहारात तेल तुपाचा वापर अगदी कमी असतो आणि जादा प्रोटीन्स देणारा आहार तो घेतो. हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली त्याचे आवडते फूड असून बहूतेक सर्व भाज्या तो उकडून आहारात घेतो. दिवसभर दर दोन तासानी तो थोडे काहीतरी खातो. अर्थात चॉकलेट हा मात्र त्याचा विक पॉइंट आहे. त्यामुळे तो डेझर्ट म्हणून चॉकलेट खाण्यास पसंती देतो असे समजते.

Leave a Comment