आता व्हिडीओद्वारे करता येणार केवायसी प्रक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, आता बँक आपल्या ग्राहकांची केवायसी प्रक्रिया (नो योर कस्टमर) व्हिडीओद्वारे देखील करू शकतात.

यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल. वारंवार बँकेत चक्करा मारण्याची गरज राहणार नाही. आता केवायसी प्रक्रिया मोबाईल व्हिडीओद्वारे संवाद साधून देखील पुर्ण होईल. यामुळे केंद्रीय बँके अंतर्गत येणाऱ्या बँकाना मोठा दिलासा मिळणार आहे.

या व्यतरिक्त आरबीआयने आधार आणि अन्य ई-कागदपत्रांद्वारे ई केवायसी आणि डिजिटल केवायसीची सुविधा दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांना मदत होईल व खर्चात बचत होईल.

मोबाईल व्हिडीओद्वारे ग्रामीण भागातील आर्थिक संस्थेचा अधिकारी पॅन अथवा आधार कार्ड आणि काही प्रश्नांद्वारे ग्राहकांची ओळख करेल. प्रक्रियेद्वारे एजेंट हे देखील सुनिश्चत करेल की ती व्यक्ती देशाच्या आतच आहे. यासाठी ग्राहकाचे लोकेशन कॅप्चर केले जाईल.

हा व्हिडीओ कॉल संबंधित बँकेच्या डोमेनद्वारेच केला जाईल. गुगल ड्युओ अथवा व्हॉट्सअॅप या द्वारे ही प्रक्रिया पुर्ण होणार नाही. बँकांना व्हिडीओ प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आधी आपले एप्लिकेशन्स आणि वेबसाईटला लिंक करावे लागेल.

Leave a Comment