‘छपाक’ पाहून भावूक झाला रणवीर सिंग


मागील बऱ्याच दिवसापांसून अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटाची चर्चा सुरू होती. हा चित्रपट अ‌ॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर विषयावर आधारित असून बरेच वादविवादही या चित्रपटाबाबत निर्माण झाले. पण आज अखेर हा चित्रपट रिलीज झाला आहे. रणवीर सिंगने हा चित्रपट पाहून भावूक होत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

Meghna, your film gives the audience hope and courage. It shows you the best and worst of humanity in a kaleidoscopic cinematic spectrum. It elucidates a subject that we’ve only ever heard of but never really fully understood. It offers a definitive and insightful deep-dive into the horrific gamut of acid violence. The story shakes you to your core and then lifts you heroically until your emotions soar. Talvar, Raazi and now Chhapaak..may I say “Bravo!” And “Encore!” ❤️ My baby. I’ve witnessed you toil relentlessly to create this special piece of work. You’ve been an engine behind the project, and are the soul of the film. This is the most important instalment in your body of work. You laboured with such honesty in intent and action. You dug deep and fought through your challenges, faced your fears, overcame your struggles and today you and your team stand triumphant as the creators of one of the films of our times. Your performance is way more than everything I thought it could and would be. It’s moved me, stirred me and stayed with me. You blended strength with vulnerability and lent dignity to an immensely complex portrayal in such a fine manner that I’m simply awestruck at your craft. Its staggering and astonishing what you’ve achieved with Malti. A glowing gem in your repertoire. I love you baby. I’ve never been more proud of you. @deepikapadukone #chhapaak

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


‘छपाक’च्या संपूर्ण टीमचे रणवीरने कौतुक केले आहे. एवढा गंभीर विषय दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल रणवीरने त्यांची प्रशंसा केली आहे. तर, दीपिकाच्या अभिनयाचेही त्याने कौतुक केले आहे. अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट आहे. लक्ष्मी आपल्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कशाप्रकारे धैर्याने सर्व गोष्टींना सामोरे जाते, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे. तिची भूमिका दीपिका पादुकोणने साकारली आहे.

फर्स्ट लूकपासूनच चित्रपटाची चर्चा होती. दीपिकाच्या लूकसोबतच तिच्या अभिनयाची रणवीरने प्रशंसा केली आहे. हा चित्रपट तिच्या करिअरमधला सर्वात महत्त्वाचा चित्रपट असल्याचेही त्याने म्हटले आहे. ‘मला तुझा खूप अभिमान वाटतो’, असे म्हणून त्याने दीपिकाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘छपाक’ चित्रपटात विक्रांत मेस्सीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अलीकडेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्य सरकारने ‘छपाक’ चित्रपट करमुक्त दाखवण्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment