एवढे तास बंद राहणार रेल्वेची संगणकीकृत सेवा

तांत्रिकी सुधारणांसाठी रेल्वेची पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस) 11 जानेवारीला रात्री 3 तास 25 मिनिटे बंद राहणार आहे. यावेळी रेल्वेसी संबंधीत सर्व संगणकीकृत सेवा बंद असतील. यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

रेल्वे अधिकाऱ्यांनुसार, 11 जानेवारीला रात्री 11.45 वाजून ते सकाळी 3.10 वाजेपर्यंत पॅसेंजर रिझर्व्हेशन सेवा तात्पुरती बंद असेल. आयव्हीआरएस/टच स्क्रीन, कॉल सेंटर (टेलिफोन नंबर -109) च्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या रेल्वे संबंधित माहिती मिळणार नाही. कॉम्प्युटरद्वारे चालणारे आरक्षणाचे काम देखील बंद असेल. यावेळी कोणतेही तिकिट देता येणार नाही अथवा रद्द करता येणार नाही.

अधिकाऱ्यांनुसार, यावेळी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून देखील तिकिटांची ऑनलाईन बुकिंग होणार नाही. रेल्वे स्टेशनवरील डोरमेट्री आणि रिटायरिंग रुमची देखील ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही.

Leave a Comment