तुम्ही पाहिले का ‘स्ट्रीट डान्सर’मधील नवे गाणे


सध्या प्रेक्षकांचा अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर अभिनीत ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणी देखील हिट होत आहेत. या चित्रपटातील नवे गाणे ‘दुआ करो’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. अरिजीत सिंगने या गाण्याला आवाज दिला आहे.

या गाण्याचा व्हिडीओ श्रद्धा कपूर आणि वरूण धवन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी या गाण्याला ‘स्ट्रीट डान्सरच्या आयुष्याची लय आणि आत्मा असलेले दुआ करो गाणे’, असे कॅप्शन दिले आहे. वरुण आणि इतर डान्सरची दमदार झलक या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याला सोशल मीडियावर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सचिन जिगर आणि बोहेमिया यांनी हे गाणे कंपोज केले आहे. २४ जानेवारीला रेमो डिसूझाचे दिग्दर्शन असलेला ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment