कॅन्सरग्रस्त एका महिलेने किमोथेरपीनंतर आजारातून बाहेर पडण्यासाठी योगाची मदत घेतली. मात्र योगाचा परिणाम या महिलेच्या 7 वर्षीय मुलावर एवढा पडला की, तो जगातील सर्वात तरूण योगा शिक्षक झाला आहे. वयाच्या 7व्या वर्षांपासून योगा शिकवणारा तबे एटकिन्स आता 14 वर्षांचा झाला आहे. तो आठवड्याला 3 योगा क्लास घेतो. यात तो वेगवेगळ 7 प्रकारचे कोर्स सर्टीफिकेट ट्रेनिंग देतो.
तबेची आई साहेल अनवारिनजाद यांना 2012 साली कॅन्सर झाला होता. किमोथेरेपी नंतर आईचे केस केल्यानंतर तबेने देखील केस कापली होती. त्याने पाहिले की, योगामुळे कॅन्सरग्रस्त आईला देखील पुन्हा उर्जा देण्यास मदत केली होती. योगामुळे तबेच्या आईचे जीवनच बदलले.

तबे सांगतो की, योगाने अशी जादू केली की आई पुन्हा आपल्या पायावर चालू लागली. या सर्वांमुळे मी एवढा आनंदी झालो की योग शिक्षकच बनायचे असे ठरवले. तो सांगतो की, कॅन्सर अथवा अन्य कोणत्याही आजारामुळे कोणाची आई लांब जाऊ नये म्हणून मी योग शिक्षक झालो. 7 वर्षांचा असल्यापासून तबे योग शिकवत आहे.
2012 मध्ये तिसऱ्या स्टेज-3 चा कॅन्सरग्रस्त असलेल्या तबेच्या आईला उपचारानंतर डॉक्टरांनी कॅन्सर मुक्त असल्याचे सांगितले. यामध्ये योगाने मोठे भूमिका बजावली.