पृथ्वी हलतानाचा हा रोमांचित करणारा व्हिडीओ एकदा पहाच

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पृथ्वी फिरत असते. मात्र पृथ्वी समान गतीने फिरत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पृथ्वी 24 तासात एक चक्कर पुर्ण करते व याप्रमाणे दिवस-रात्र पाहिला मिळतात. चित्रपट निर्माते अतूल कसबेकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, हा सुंदर व्हिडीओ पाहून तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी आपल्या जागेवर फिरत आहे.

हा शानदार व्हिडीओ अतुल कसबेकर यांनी 8 जानेवारील ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला आहे. अतुल निर्माते असण्याबरोबरच फोटोग्राफर देखील आहेत. त्यांनी ‘नीरजा’, ‘तुम्हारी सुलू’ सारखे चित्रपट प्रोड्यूस केले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, एका एस्ट्रॉग्रफरने हा व्हिडीओ काढला आहे. यात पृथ्वी फिरताना आपण पाहू शकतो. या सुंदर क्षणला ट्रॅकिंग माउंटचे मदतीने कैद केले आहे. ट्रॅकिंग माउंट ध्रुव ताऱ्याच्या दिशेने ठेवला, जे पुढील 3 तास प्रत्येक 12 सेंकदाने फोटो काढत होते.

पृथ्वी समान गतीने फिरत असते, त्यामुळे त्याच्या फिरण्याचा अनुभव आल्याला होत नाही.

Leave a Comment