सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’चा ट्रेलर रिलीज


एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांसाठी अभिनेता सैफ अली खान ओळखला जात होता. पण, मध्यंतरीच्या काळात त्याने काही गंभीर भूमिका साकारल्या. पण आता तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच त्याच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

सैफ अली खानसोबत या चित्रपटातून पूजा बेदीची मुलगी आलिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर, अभिनेत्री तब्बूदेखील आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो एकदम कुल अंदाजात दिसला आहे. मात्र, त्याची मुलगी आणि पत्नी आल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय गोंधळ उडतो, याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

सैफ अली खानच्या ‘ओले ओले’ गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जनदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले आहे. हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी हिमेश रेशमिया आणि सोनिया मान यांचा ‘हॅप्पी, हार्डी अँड हिर’ हा चित्रपट देखील रिलीज होणार असल्यामुळे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment