ज्येष्ठ नागरिकांना या उत्पन्नावर भरावा लागणार नाही कर

केंद्र सरकारने मागील वर्षी बजेटमध्ये कराच्या नियमात अनेक बदल केले होते. याच बदलांतर्गत सरकारने कलम 80टीटीबीचा समावेस केला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यतच्या व्याजावर करात सूट मिळते. थोडक्यात, एफडी, रेकरिंग डिपॉजिट अथवा बचत खात्यावरून व्याज मिळत असेल तर 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर सूट मिळते.

जर एखादी ज्येष्ठ व्यक्ती 80टीटीबी अंतर्गत करात सूट घेत असेल तर कलम 80टीटीए अंतर्गत सूट मिळणार नाही. 80टीटीबीचा फायदा केवळ ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. दुसरे करदाता अथवा एचयूएफ धारकांना सूट मिळणार नाही. साधारणपणे 80टीटीए अंतर्गत कोणत्याही करदात्याला 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर करात सूट मिळते.

80टीटीबी आणि 80टीटीए मधील फरक

80टीटीए – हे कलम सर्व करदात्यांसाठी आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी 80टीटीबी अंतर्गत करात सूट घेतली असेल तर 80टीटीएमध्ये सवलत मिळणार नाही. यात कमाल 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावरील करात सूट मिळते. पोस्ट ऑफिस आणि बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर सूट मिळते.

80टीटीबी – या अंतर्गत केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच करात सूट मिळते. यात कमाल 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर सूट मिळेल. एफडी, रेकरिंग डिपॉजिट आणि बचत खात्यांद्वारे मिळणाऱ्या व्याजावर सूट मिळते.

Leave a Comment