अशी झाली ‘गगनयान’साठी अंतराळवीरांची निवड

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी 2020 च्या आपल्या मिशनबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, वर्ष 2020 मध्ये गगनयान प्रोजेक्टसोबत चंद्रयान-3 प्रोजेक्टवर देखील काम सुरू आहे. गगनयान अंतराळ इस्त्रोचे पहिले मानव मिशन आहे. यासाठी भारतीय हवाई दलाचे 4 पायलट निवडले गेले आहेत. त्यांची ट्रेनिंग जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रशियामध्ये सुरू होईल.

इस्रो मानव अंतराळ मिशनवर 2007 पासून काम करत आहे. इस्त्रोकडे असे रॉकेट अथवा क्रायोजेनिक इंजिन नव्हते, जे वजनदार क्रू मॉड्यूलचे वजन उचलू शकेल. आता इस्त्रोचे प्रयोग क्रायोजेनिक इंजिन बनविण्यास यशस्वी झाले आहेत. इस्त्रोने पुन्हा एकदा जीएसएलव्ही मार्क 3 द्वारे गगनयान मिशनची तयारी केली आहे.

Image Credited – Amarujala

इस्त्रोचे आधीचे मिशन 2 अथवा 3 भारतीय अंतराळ प्रवाशांना सात दिवसांसाठी अंतराळात पाठवणे आणि त्यांना पुन्हा सुरक्षित परत आणणे हे होते.

इस्त्रोचे चेअरमन सिवन यांनी घोषणा केली आहे की, सर्व काही व्यवस्थित झाले तर डिसेंबर 2021 पर्यंत प्रयोग पुर्ण होईल. 2019 मध्ये अंतराळ प्रवाशांच्या निवडी व्यतरिक्त, अंतराळ प्रवाशांच्या टीमने क्रू मॉड्यूलचे यशस्वीरित्या परीक्षण केले. परीक्षणादरम्यान अंतराळ प्रवाशांना अपघातापासून वाचण्यासाठी रॉकेटपासून वेगळे करण्यासाठी अबॉर्ट चाचणी देखील यशस्वीरित्या पुर्ण केली.

Image Credited – Amarujala

अंतराळ प्रवाशांची निवड प्रक्रिया खूप आधीच सुरू झाली होती. इस्त्रो आणि हवाईदलाने अंतराळ प्रवाशांच्या निवड, प्रशिक्षण आणि गगनयान कार्यक्रमाच्या दुसऱ्या गोष्टींसाठी 29 मे 2019 ला एक करार केला होता. यानुसार, प्रक्रिया 12 ते 14 महिने चालेल.

भारतीय अंतराळ प्रवाशांच्या निवडीचे काम इंस्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसन करते. 1957 मध्ये हवाई दलाचे एक सहकारी संस्था म्हणून या एजेंसीची स्थापना झाली आहे.. पायलट्सना प्रशिक्षित करण्यासाठी एअरोस्पेस मेडिसन हवाई दलाची मदत करत आहे. यामुळेच अंतराळ प्रवाशांच्या निवडीचे काम या एजेंसीला सोपवण्यात आले आहे.

Image Credited – Amarujala

अंतराळात जाणारे प्रवाशी चांगले पायलट असणे आवश्यक आहे. याशिवाय ते इंजिनिअर असावे. आधी अंतराळ प्रवाशांच्या निवडीसाठी अर्ज मागवले जातात. यासाठी हवाई दलातील पायलट विभागात अधिसूचना जारी केली जाते. अर्ज केलेल्या उमेदवारांचे मुल्यांकन केले जाईल आणि योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची अंतराळ प्रवासासाठी शारीरिक योग्यता तपासण्यासाठी मेडिकल टेस्ट होईल. यशस्वी उमेदवारांना पुढे परिक्षणासाठी पाठवले जाईल.

दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या पायलट्सना शारीरिक प्रशिक्षण दिले जाईल. जे शारीरिक चाचणीत निवडले जातील. त्यांना अंतराळ परिक्षणासाठी निवडण्यात येईल. 30 हवाई दलाच्या पायलट्सची निवड करण्यात येईल. त्यातील 15 जणांना अंतराळ प्रवाशी म्हणून मुलभूत प्रशिक्षण दिले जाईल व अखेर 9 जणांची निवड केली जाईल. या 9 जणांना परदेशात पुर्णवेळ अंतराळ प्रवाशी म्हणून प्रशिक्षण देण्यात येईल.

Leave a Comment