शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या बँकांविरोधात सरकार घेईल गंभीर निर्णय


पुणे – सुरक्षा रक्षकांनी मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना रोखले होते. त्यांनी बँकेने आपल्याला विनाकारण त्रास दिल्याची तक्रार केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतल्यानंतर बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकरी खातेदाराला बँकेने त्रास दिल्यास, त्यांच्याविरोधात सरकार गंभीर निर्णय घेईल, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. भूमिगत मेट्रोच्या कामासाठी नव्याने आलेल्या टीबीएम टनेल बोरिंग मशीनची एकनाथ शिंदे यांनी काल पाहणी केली. मेट्रोच्या दुसऱ्या भुयारी मार्गाचा शुभारंभही त्यांच्याच हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, एका महिन्याच्या आत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या दोन लाखांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक पार पडली आहे. या बैठकीत संबंधित बँका, अधिकारी यांना कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment